पुणे : ओल्ड मॉन्क्स स्पोर्टस क्लब आणि जोसेफ डिसुझा चेस अकादमी आयोजित ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठी झालेल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात रघुबर त्यागी यांनी तर, महिला गटात कांचन लुणावत यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत एकूण 64 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये 60 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील 48 पुरुष स्पर्धक आणि महिला गटात 50 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील 16 महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सर्वात वयाने जास्त असलेल्या मुकुंद अवसारीकर आणि श्रीमती आशा कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ही स्पर्धा जोसेफ डिसुझा बुद्धिबळ अकादमीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन क्लबचे अध्यक्ष गोस्वामी, मिलिंद शिरोडकर, नाना राऊत, जयसिंग मोहिते आणि निवृत्त पोलीस अधिकारी सदानंद बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कार वितरण क्लबचे सचिव प्रकाश रेणुसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रवींद्र फटाले, सुरेश काळे, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संचालक जोसेफ डिसुझा व पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दीप्ती शिदोरे यांनी प्रमुख पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते
महिला गट – 1. कांचन लुनावत, 2. ज्योस्त्ना हापसे, 3. ललिता नेवासकर, 4. तेजश्री कपडेकर, 5. मेघना जोशी, सर्वात ज्येष्ठ महिला खेळाडू – आशा कुलकर्णी. पुरुष गट – 1. रघुबर त्यागी, 2. चंद्रकांत डोंगरे, 3. उदय सहस्रबुद्धे, 4. सुरेश जगताप, 5. गिरीश जोशी, सर्वात ज्येष्ठ खेळाडू – मुकुंद अवसारीकर.