uts platform ticket : आता तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लांबच लांब रांगेत उभे राहायची गरज पडणार नाही कारण आता एका क्लीकवर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार आहे. तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट UTS अॅपद्वारे सहज काढू शकता.
रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातात. अशात प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक आहे. अशावेळी प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी अनेकदा लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते अशात जर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहायचे नसेल, तर तुम्ही ते ऑनलाइन मिळवू शकता.
जाणून घेऊया प्लॅटफॉर्म तिकिट ऑनलाईन काढण्याची सोपी पध्द्त
- रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे
- यामध्ये, नोंदणीसाठी आणि आर-वॉलेट रिचार्ज करण्यासाठी तुमचे तपशील तुमच्या नेट बँकिंग, UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्डशी लिंक करा. यानंतर, अॅपवर जा आणि प्लॅटफॉर्म तिकिटासाठी तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनचा पर्याय निवडा.
- यानंतर तुमच्या समोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्याचा पर्याय दिसेल. यामध्ये स्टेशनचे नाव, तिकीट क्रमांक आणि पेमेंट पर्याय निवडा.
- यानंतर Book Ticket चा पर्याय निवडा. यानंतर, पेमेंट करताच, प्लॅटफॉर्म तिकीट तुमच्या समोर येईल.
- हे तिकीट तुम्ही अॅपच्या शो तिकीट पर्यायामध्ये पाहू शकता.