काम असेल, तरच घराबाहेर पडा, अन्यथा… : पोलीस

“ब्रेक द चेन’ मोहिमेला सहकार्य करण्याचे पुणेकरांना आवाहन

पुणे – करोना संसर्ग तोडण्यासाठी शासनाने “ब्रेक द चेन’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत शहरात बुधवारी (दि. 14) सायंकाळी 6 वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्य शासनाने दिलेल्या सवलती व अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्‍ती वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास बंदी (144 (2)) घालण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

महापालिकेने घालून दिलेल्या अटी व शर्थी, अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक सेवा तसेच वस्तू याबाबतच्या सवलती व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

शासनाने सांगितलेल्या सेवांव्यतिरिक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 नुसार तसेच साथरोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे अवाहन डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.