बर्लिन – जर्मनीच्या सरकारने (Germany Govt) आज नव नाझीवादी (neo-Nazi group) हॅमेरस्किन्स जर्मनी या संघटनेवर बंदी घातली आणि या संघटनेत्या डझनभर सदस्यांच्या घरांवर छापे घातले. ही संघटना म्हणजे अमेरिकेतील कट्टरवादी गटाची परदेशातील एक शाखा असून संपूर्ण युरोपात या गटाचा प्रभाव आहे.
हॅमेरस्कीन्स जर्मनी या संघटनेची मूळ संघटना हॅमेरस्किन्स नेशनची स्थापना 1988 साली अमेरिकेत झाली होती, असे जर्मनीच्या गृगमंत्रालयाने म्हटले आहे. युरोपात या संघटनेने कडव्या उजव्या विचारसरणीने प्रभावित कारवाया केल्या आहेत. जगभरात पसरलेल्या या संगटनेचे सदस्य उपसांस्कृतिक जीवनपद्धती अनुसरणारा एक उच्चभ्रू बंधुवर्ग म्हणून स्वतःची ओळख सांगतो.
या संघटनेवरील बंदी ही संघटित कडव्या उजव्या गटासाठी एक हादरा आहे, असे जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी सांगितले. या संघटनेची उपशाखा असलेल्या क्रू-38 वर देखील बंदी घालण्यात आली आहे.
जर्मनीमध्ये या संघटनेचे 130 सदस्य आहेत. एकूण 10 प्रांतांमधील या सदस्यांवर आज पहाटेच्या सुमारास छापे घातले गेले. पोलिसांनी 28 सदस्यांच्या घरांच झडती घेतली. मात्र कोणाला ताब्यात घेतले का हे समजू शकले नाही. या कारवाईसाठी जर्मनीमधील राष्ट्रीय आणि प्रांतीय सरकारांनी वर्षभरापासून एकमेकांना सहकार्य केले होते. तसेच यासाठी अमेरिकेचीही मदत घेण्यात आली होती, असेही फेसर म्हणाल्या.
नाझी विचारांवर आधारलेली तत्वप्रणाली…
हॅमेरस्किन्स जर्मन या गटाची विचारसरणी नाझी विचारसरणीवर आधारलेली वांशिक तत्वप्रणाली आहे. जगभरातील कडव्या उजव्या विचारसरणीच्या गटांना एकत्र करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. नवीन सदस्यांना आकृष्ठ करण्यासाठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हॅमरस्किन्स जर्मनीची बंदी ही जर्मनीच्या अंतर्गत मंत्रालयाने उजव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनेची 20 वी बंदी आहे.
नाझीवाद काय आहे ?
नाझीवाद हा शब्द नाझी जर्मनीच्या नाझी पक्षाची धोरणे व विचारधारांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. नाझीझम हा फॅसिझमचाच एक प्रकार मानला जात असून त्यामध्ये वर्णद्वेष, ज्यूविरोध इत्यादी तत्त्वे देखील सामील होती. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून व कम्युनिस्ट-विरोधी विचारांमधून नाझीवादाचा उगम झाला. नाझीवादाचा भांडवलशाही व साम्यवाद ह्या दोन्ही तत्त्वांना विरोध असून राष्ट्रीय एकात्मता व संस्कृतीवर आधारित एकसारखा समाज निर्माण करणे हे त्याचे ध्येय होते.
५ जानेवारी १९१९ रोजी वायमार प्रजासत्ताकामध्ये नाझी पक्षाची स्थापना झाली. पुढील काही वर्षांमध्ये ॲडॉल्फ हिटलरने नाझी पक्षावर संपूर्ण नियंत्रण केले व पक्षाच्या ज्यूविरोधी धोरणांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. १९२४ सालच्या माइन काम्फ ह्या पुस्तकामध्ये हिटलरने नाझीवादाची तत्त्वे समजावली आहेत. नाझीवाद ही पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये उदयाला आलेली एक सर्वंकष स्वरूपाची विचार प्रणाली आहे जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर याने नाझीवादाची मांडणी केलेले आहे