नवी दिल्ली – संसदेच्या नवीन इमारतीला (New building of Parliament) भारतीय संसद भवन (Parliament House of India) म्हणून घोषित करणारी अधिसूचना लोकसभा सचिवालयातर्फे (Lok Sabha Secretariat) जारी करण्यात आली आहे. संसद भवनाच्या परिसरात प्लॉट क्रमांक 118, नवी दिल्ली, विद्यमान संसद भवनाच्या पूर्वेला, दक्षिणेला रायसीना रोड आणि उत्तरेला रेड क्रॉस रोड असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीला भारताची अधिकृत संसद सूचित करताना आनंद होत आहे असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय संसद भवनाचा दर्जा –
आता या इमारतीला अधिकृतपणे भारतीय संसद भवनाचा दर्जा देण्यात आला आहे. या नव्या इमारतीत संसदेचे काम सुरू होण्यापुर्वी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काल जुन्या संसद भवनात संसदेचे अधिकृत शेवटचे अधिवेशन झाले. त्यावेळी गेल्या 75 वर्षांच्या संसदीय कार्यपद्धतीच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.