मुंबई – बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा आज 41 वा वाढदिवस. मराठामोळ्या रितेशने बॉलिवूडमध्येस्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तर तो नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांमुळे आणि कौटुंबिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केल्यामुळे चर्चेत असतो.
दरम्यान, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही बॉलिवूडचे क्यूट कपलपैकी एक आहेत.रितेशच्या बर्थडे निमित्य जेनेलियाने इन्टाग्रामवर कौटुंबिक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
Every woman needs a man that will ruin their lipstick not their mascara.. @riteishd
जेनेलियाने इन्टाग्रामवर या फोटोला कॅपशन दिले आहे की,’नेहमीच माझं सोबत असणार माझं लव्ह, जेव्हा तू १०० वर्षच्या होशील तेव्हा सुद्धा मी हेच म्हणणार जे मी आता म्हणते आहे. तू माझं वर्तमान आणि भविष्य आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’