मराठीमधील सुपरहिट ठरलेल्या “सैराट’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेक असलेल्या “धडक’ या चित्रपटातून जान्हवी कपूरने गेल्यावर्षी बॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर अद्याप तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तथापी, असे नाही की जान्हवीकडे चित्रपट नाही. तिच्याकडे करण जोहरचा “तख्त’शिवाय “दोस्ताना-2-, “रुहीअफ्जा’ आणि “कारगिल गर्ल’ असे अनेक चित्रपट असून ते पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.
तसेच जान्हवी लवकरच साउथ इंडस्ट्रीमध्येही डेब्यू करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ती साउथमधील सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. करण जोहर हा पुरी जगन्नाथच्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक साकारणार असल्याने यासाठी त्याचे जान्हवीचे नाव सुचविले होते. या चित्रपटाचे “फायटर’ असे निश्चित करण्यात आले आहे.
या चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि अनन्या पांडे यांनाही अप्रोच करण्यात आले होते. परंतु करण जोहरने जान्हवीचा आग्रह केल्याने या चित्रपटासाठी जान्हवीचे नावे निश्चित करण्यात आले. तसेच जान्हवीसोबत डेट्स अडजस्ट झाल्यास या चित्रपटाचे शुटींग लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही.
दरम्यान, जान्हवी सध्या “दोस्ताना-2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारत आहे.