जमैका – वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत त्यांच्या क्रिकेट मंडळाने दिले आहेत. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रामनरेश सरवान याच्याबद्दल अवमानकारक टीप्पणी केल्याने गेलवर अत्यंत कठोर कारवाई होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
कॅरेबियन लीग स्पर्धेत जमैका तलैवाज संघातून गेलला काही दिवसांपूर्वी डच्चू देण्यात आला होता. त्यावर संतप्त होत गेलने सरवानला करोनापेक्षाही घातक असल्याचे म्हटले होते. यावरुन आता वेस्ट इंडिज मंडळ आक्रमक झाले असून एकतर सरवानची जाहीरपणे बिनशर्त माफी माग अन्यथा कठोर कारवाईला तयार रहा असा निर्वाणीचा इशारा गेलला देण्यात आला आहे.