मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. मराठी अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
‘तुला पाहते रे’ मालिकेत गायत्रीने साकारलेली ईशा निमकर ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली. तिची बोलण्याची पद्धत तीचे काही डायलॉग आजही जसेच्या तसे लोकांना आठवतात.
दरम्यान, आत लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते, मात्र आता चित्रपटांचे शूटिंग जुलै महिन्यात सुरु झाले आहे.
याच काळात नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गायत्रीचा अतिशय गोड दिसून येत आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी प्रोजेक्ट विषयी माहिती देत असते.
मात्र यावेळी तिच्या फोटो कॅप्शन मुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. नजरोंका खेल? वो तो बरसोंसे खेलते आ रहे है! , बहारा… बहारा… हुआ दिल पहली बार ये..! , चश्मे पर ना जाओ जनाब… असली राज तो आखोंमे छिपे है!,
In this variable life, let your smile be constant!, You Gossip, I Boss Up! तिच्या फोटोवरील या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे.