गौतम सहकारी बॅंकेला 58 लाख नफा

रिजर्व्ह बॅंकेच्या संमतीने लाभांशही देणार : काळे

कोपरगाव  – तालुक्‍यातील उद्योजक, व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणाऱ्या व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बॅंकेला नुकत्याच संपलेल्या सन 2018-19 या आर्थिक वर्षात 58 लाख रुपये करपूर्व नफा झाला असून भारतीय रिजर्व्ह बॅंकेने सभासदांना लाभांश देण्याची परवानगी दिल्यास सभासदांना लाभांशही देणार असल्याची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली आहे.

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळेंनी कोसाका उद्योग समूहाची उभारणी करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी कारखाना उद्योग समूहाचे कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी व परिसरातील छोट्या- मोठ्या उद्योजकांना व्यवसायासाठी तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी गौतम सहकारी बॅंकेची स्थापना केली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या अतूट विश्‍वासावर गौतम सहकारी बॅंकेने अल्पावधीतच विश्‍वसनीय संस्था म्हणून नावलौकिक मिळविला होता. परंतु काही वर्षापूर्वी कर्जवसुली व सरकारच्या चुकीचे धोरणामुळे बॅंकेला 4 कोटी 79 लाख रुपयांचा तोटा झाला होता.

त्यावेळी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या काटकसरीच्या धोरणातून व बॅंकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षात 2009 साली तोट्यात गेलेली बॅंक मागील वर्षात संपूर्णपणे तोटामुक्त केली तसेच आर्थिक वर्षात बॅंकेने 35 लाख रुपये आयकर भरून राष्ट्रीय कार्यास मोठा हातभार लावला आहे. आज रोजी बॅंकेचे नेट एन.पी.ए.चे प्रमाण 4% पेक्षा खाली आले आहे.

बॅंकेने सन 2018-19 या आर्थिक वर्षात 302 खात्यांवर 22.29 कोटींचा संमिश्र व्यवसाय केला आहे. कर्जवाटपामध्ये रुपये 14.56 कोटींची वृद्धी झालेली असून ठेवी मध्ये रुपये 9.60 कोटीची वाढ झालेली आहे. बॅंकेचे वसूल भाग भांडवल 4 कोटी 59 लाख, राखीव निधी 7 कोटी 58 लाख 81 हजार, ठेवी 87 कोटी 11 लाख 45 हजार, कर्जवाटप 54 कोटी 62 लाख 92 हजार व गुंतवणूक 38 कोटी 51 लाख 93 हजार करून 58 लाख 44 हजार रुपये निव्वळ नफा झालेला आहे. गौतम सहकारी बॅंकने नेहमीच अती सामान्य, गरजू व सर्व समाजातील सर्व स्थरातील नागरिकांच्या कर्जाच्या माध्यमातून गरजा पूर्ण करण्यासाठी व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. बॅंकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ,मुख्य शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांनीही बॅंकेला नफा मिळवून देण्यात परिश्रम घेतले आहे. मागील वर्षी गौतम बॅंक संपूर्ण तोटामुक्त झाल्यामुळे सभासदांना पुढील वर्षी लाभांश देण्याचे मी जाहीर केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.