आंबोली व कोयना येथील फुलपाखरांवर विशेष अभ्यास

संदीप राक्षे

पश्‍चिम महाराष्ट्रातल्या फुलपाखरांचे मराठी बारसे

फुलपाखरांची नावे वेबसाईटवर
फुलपाखरांच्या नोंदीकृत फुलपाखरांची नावे महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या वेबसाइटवर नोंद करण्यात आली आहे. फुलपाखरांच्या नावांची नोंद करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यात सर्वत्र आढळणाऱ्या 285 पेक्षा अधिक फुलपाखरांना चक्क आता मराठी नावे मिळाली आहेत. ढवळ्या, पवळ्या, कवडा, गुब्बी, अशोका या गमतीशीर नावांनी ही फुलपाखरे आता ओळखली जाणार असून राज्य जैवविविधता महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. फुलपाखरांच्या शास्त्रीय नोंदी आता चक्क मराठी नावाने होणार असून यामुळे लॅटिन भाषेतील नोंदीची परंपरा मोडीत निघणार आहे. पश्‍चिम घाटाचा अधिवास दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी व वेगळ्या प्रजातीच्या कीटकांनी प्रचंड समृद्ध आहे. महाराष्ट्रात जी वेगवेगळ्या प्रजातीची तीनशे फुलपाखरे आढळतात ती लॅटिन नावानेच ओळखली जातात.

कमांडर, सार्जंट, लास्कर, काउंट, ड्यूक, सेलर, या विविध पदावर काम करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी कम संशोधकांनी ही नावे दिली. भारतीय फुलपाखरांना चक्क लॅटिन नावे हा फरक दूर करण्याचा निर्णय राज्याच्या जैवविविधता महामंडळाने सहा महिन्यापूर्वी घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी तत्त्वतः 25 एप्रिल सुरू होत आहे. या उपक्रमासाठी नेमलेल्या समितीत फुलपाखरू अभ्यासक डॉ. विलास बर्डेकर, हेमंत ओगले, जयंत वडतकर, दिवाकर ठोंबरे, राजू कसंबे यांचा समावेश आहे.

या समितीने गडचिरोली, चंद्रपूर, सापुतारा, आंबोली, कोयना, बाबू कडा (वासोटा) या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन फुलपाखरांचे प्रजोत्पादन व त्यांचा दिनक्रम यांचा विशेषत्वाने अभ्यास केला. वेबसाईटवर प्रसिद्ध असणाऱ्या फुलपाखरांविषयी सांगताना डॉ. बर्डेकर म्हणाले, राज्यात फुलपाखरांच्या पंधराशे जाती आढळतात. एकट्या महाराष्ट्रात या प्रजाती 285 आहेत. ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला दोन वर्षांपूर्वी अधिकृत राज्य फुलपाखराचा
दर्जा देण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.