मुंबई – आज महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम राबविले जात आहे. यादिवशी महाराष्ट्रात कामगार दिन देखील साजरा केला जातो. याच निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतील अभिनेता गौरव मोरेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने बाबासाहेब आंबडेकर यांचे स्मरण करून दिले आहे.
गौरवने इनस्टाग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ”कामगारांचे खरे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. कामगार दिनाच्या मंगलकामना’ असे लिहिले आहे. त्याच्या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दुसऱ्या फोटोत ‘मंगल देशा.. पवित्र देशा.. महाराष्ट्र देशा.. ‘ असं म्हणत महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा त्याने दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, गौरव बाबासाहेब आंबेकर यांच्याविषयी कायमच कृतज्ञता व्यक्त करतो. काही दिवसांपूर्वी गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला होता. सोबतच “आपण आहोत, कारण ते होते…बाबासाहेब धन्यवाद,” असं कॅप्शन गौरवने या फोटाला दिलं होतं.
View this post on Instagram
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरे ओळखला जातो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो खऱ्या अर्थाने नावरुपाला आला. गौरवने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं असून ‘हवाहवाई’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. गौरवने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केले होते. यामध्येही त्याने विनोदी भूमिका साकारली होती.