नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोदींच्या वाहनासमोर मोबाईल फेकला असल्याचे सांगण्यात येतआहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईल कोणीतरी हेतुपुरस्सर फेकला की फुले फेकताना ही घटना घडली याचा तपास पोलिसांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री योगी देखील आज कर्नाटकात आहेत. दोघांनी जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये मोबाईल फेकण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, एसपीजी जवानांनी तात्काळ तो मोबाईल नरेंद्र मोदींच्या गाडीतून काढून घेतला. हा फोन चुकून भाजप समर्थकाच्या हातातून निसटला आणि तो मोदींच्या ताफ्याच्या गाडीसमोर आला. प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे, पोलिसांनी याला दुजोरा दिला.
मैसूर रोड शो के दौरान प्रधानमंत्री @narendramodi पर किसी ने मोबाइल फेंका। हालांकि प्रधानमंत्री मोदी से थोड़ा दूर जाकर गिरा। अभी तक यह साफ नहीं है कि किसी ने जानबूझकर किया या गलती से। #KarnatakaElections2023 pic.twitter.com/1Ayew44KdD
— Pinky Rajpurohit 🇮🇳 (@Madrassan_Pinky) April 30, 2023
कर्नाटकमध्ये तीन महिन्यांत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आली आहे. यापूर्वी २५ मार्च रोजी दावणगेरे येथे निवडणूक कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती मोदींच्या दिशेने धावत आली होती. दावणगेरे येथे पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू होता. दोन्ही बाजूला गर्दी होती. दरम्यान, एका व्यक्तीने पळत जाऊन नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकीसाठी येथील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या ताकदीसाठी आणि निवडणुकीतील विजयासाठी येथे मेगा रोड शो करणार आहेत.