ऍक्ट्रेस गौहर खान आणि जैद दरबार यांचा निकाह झाल्यानंतर आता ते मॅरेज लाईफ मस्त एन्जॉय करत आहेत. मॅरेज सेलिब्रेशन संपल्यानंतर आता या जोडीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यातील एका फोटोमध्ये गौहर खानने नवऱ्याला उचलून घेतलेले दिसते आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये गौहर खानने आपल्या नवऱ्याबरोबरचे बॉण्डिंग किती भरभक्कम आहे हे सांगितले आहे, चांगल्या वेळी, वाईट वेळी, कमकुवत असताना, समर्थ असताना सर्व वेळ माझ्याबरोबर आहे जैद दरबार, असे तिने म्हटले आहे.
View this post on Instagram
एरवी नवऱ्याने बायकोला उचलून घेतले असते तर त्यामध्ये काही विशेष वाटले नसते. पण बायकोने नवऱ्याला अशा प्रकारे उचलून घेण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. जैद दरबारला सहज उचलू शकण्याची क्षमता गौहर खानमध्ये आहे, एवढे मात्र या फोटोमधून स्पष्ट झाले. यापूर्वीही गौहर खानने दरबार बरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
त्यांच्या निकाहच्या वेळी जैद दरबारचे वडील इस्माईल दरबार यांनी अनेक गाणी गायली होती. गेल्या महिन्यात यांचे लग्न झाले होते. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील फारच थोडे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.