तळेगाव स्टेशन – वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी उपकरणांचे संशोधन करून तयार करण्याचे कार्य करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील डॉ. खान क्रिएशन्स या संस्थेने करोनाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक लाईटद्वारे अल्ट्रा बाइओलेट अर्थात यूव्ही क्लिन (UV_Klean UVC) उपकरण तयार केले आहे, असा दावा डॉ. खान क्रिएशनकडून करण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. खान यांच्या क्रिएशनने जंतुनाशक लाईटद्वारे करोनाचा नाश करण्यासाठी यूव्ही क्लीन उपकरण तयार केले आहे. या संदर्भात डॉ. मुबारक खान, डॉ. सपना परब यांचे आतापर्यंत 50 शोधनिबंध विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
तळेगाव दाभाडे येथील सुश्रुत ईएनटी हॉस्पिटलचे डॉ. मुबारक खान, डॉ. सपना परब हे करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहेत. याशिवाय सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मुबारक खान, डॉ. सपना परब यांनी 10 टक्के पोवोडीन आयोडिनपासून 0.5 टक्केचे द्रावण तयार केले आहे. या द्रावणाचा वापर वेगवेगळ्या विषाणूंना निष्क्रिय करण्यासाठी येतो.
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण, मुख्यतः कान, नाक, घसा तसेच दातांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णास अशा प्रकारे 0.5 टक्के पोवोडिन आयोडिन गार्गल व नाकाचे ड्रोप म्हणून वापरल्यास तपासणी करताना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते.
या संशोधनाची दखल अमेरिकेतील जर्नल्सने घेतली असून, हे संशोधन त्यांनी आपल्या जर्नल्समधून प्रसिद्ध केले आहे. डॉ. खान क्रिएशन्स ही पार्टनरशिप फर्म असून, ही फर्म डॉ. मुबारक खान, डॉ. शिरीन खान, डॉ. सपना परब यांच्याद्वारे तयार केलेली आहे.
दरम्यान, अल्ट्रा बाइओलेट किंवा अतिनील किरणे हे जंतुचा नाश करण्यासाठी केला जातो. ही किरणे डोळे व त्वचेवर काही प्रमाणात दुष्परिणाम करु शकतात. योग्य काळजी घेऊन वापरल्यास आपण करोनापासून बचाव करू शकतो, असा दावाही डॉ. खान यांनी केला आहे.