गारवा हॉटेलमालक खून प्रकरण : आरोपीच्या घरात सापडल्या दोन तलवारी, पत्नीस अटक

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे(प्रतिनिधी) – हॉटेल व्यवसायात अडथळा येत असल्याने गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्या प्रकरणात तलवार घरात लपवून ठेवल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीस अटक केली आहे.

न्यायालयाने तीला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.

ती महिला अटक केलेल्या नीलेश आरते यांची पत्नी आहे. या प्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उरुळी कांचन परिसरात 18 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.