मावळात ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना
मावळ – पावसाच्या हलक्या सरी झेलत आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत सोमवारी (दि. 2) गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर घरोघरी सुखकर्त्याचे आगमन झाले. टाळ-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आबालवृद्धांनी जल्लोषात स्वागत केले.
मावळातील गणेश मंडळ आणि घरोघरी “श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या आनंद उत्सवाच्या निमित्ताने पुढील दहा दिवस हा जल्लोष पाहायला मिळणार आहे.