नगर, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगावातून अवैध गांजा विक्री करणारा एक जण ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून १ लाख ६ हजार ५१० रुपयांचा १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप बाजीराव पायमोडे (वय ३२, रा. मंजुर, ता. कोपरगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील मंजुर येथे प्रदीप पायमोडे हा त्याच्या घरातून अवैध गांजा विक्रीकरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीनुसार घराची पंचा समक्ष झडती घेतली असता कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला असलेला १० किलो गांजा मिळुन आला. बाबत आरोपी विरुध्द पोलीस बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात व अंमलदार बाळासाहेब मुळीक, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे व प्रियंका चेमटे यांच्या पथकाने केली.