नगर (प्रतिनिधी) – व्यायामासाठी गेलेल्या व्यावसायीकाला चौघांनी धारधार शस्त्राचा धाख दाखवून त्याचे डोळ्यामध्ये स्प्रे मारून त्याचे हातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितली. तुझ्या मुलीला सुखरूप पहायचे असेल तर ५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. खंडणी दिली नाही, तर तुझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी देणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नागेश चिमाजी देवकर (वय २८, रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी, जि. नगर), शशिकांत युवराज सुखदेव (वय २५, रा. शिक्षक कॉलनी, पढेगांव रोड, बेलापुर, ता. श्रीरामपुर, हल्ली रा. सुभाषनगर, वांबोरी, ता. राहुरी, जि. नगर) असे सुरुवातील ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपींचे दोन साथीदार बबलु रामदास कुसमुडे (वय 30, रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी, जि. नगर), संदीप रामदास कुसमुडे (वय ३५) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे. याबाबत अक्षयकुमार सुरेशचंद मुथ्था वय ४५, रा. वांबोरी यांनी तक्रार दाखल केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा वांबोरी येथील नागेश देवकर याने त्याच्यासाथीदारासह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पांढरीपूरल परिसरात सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, जालींदर माने, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.