ganpati festival 2021 : पुण्यातील गणेशोत्सव हा सामाजिक सलोख्याचा आदर्श

पुणे – जगप्रसिद्ध ठरणाऱ्या पुण्यनगरी च्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सर्वधर्मीय बांधवांचा सक्रिय सहभाग ही त्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती चे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी व्यक्त केले. मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्ट च्या वतीने मुस्लिम बांधवांच्या वतीने पुण्यातील मानाच्या गणपतींच्या महाआरती चे आयोजन करण्यात आले होते , त्याप्रसंगी शेटे बोलत होते . 

गेली सोळा वर्षे मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुस्लिम बांधवांच्या वतीने बेलबाग चौकात गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे सन्मान व गणपतीची आरती करण्यात येते पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा योग आला नव्हता म्हणून यंदा मंडळांमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांनी बाप्पाची महाआरती केली.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सोळा  राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संयोजक मुस्लिम औकाफ ट्रस्टचे अध्यक्ष श्री मुस्ताक भाई पटेल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना गणेशोत्सव हा सर्व धर्मांच्या उत्साहाचा मानबिंदू असून आम्हाला सर्वांनाच यामध्ये त्यामध्ये सहभागी होताना मनस्वी आनंद होतो.

दरवर्षी मिरवणुकीत पोलीस बांधवांना व गणेश भक्तांना मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रमपरिहार म्हणून शीरखुर्मा देण्यात येतो तसेच रमजानमध्ये अनेक मुस्लीम बांधव मोदक खाऊन उपवास सोडतात ही आपली संस्कृती असून त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे असे स्पष्ट केले. या प्रसंगी मानाच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार,प्रविण शेठ परदेशी, विकास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन युसूफ बागवान, हाजी इक्बाल तांबोळी, बाबर शेख, आबू शेठ तांबे, अली भाई सैयद, तौसिफ कुरेशी, युसुफ भाई चाबी वाले ,एड. मारूफ पटेल, इक्बाल दरबार एड. जाकीर अत्तार यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.