हॅपी बर्थ डे: फैशन क्विन ‘प्रिया बापट’

मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. आज म्हणजेच, 18 सप्टेंबर रोजी प्रिया बापट हिचा वाढदिवस आहे.

 

View this post on Instagram

 

Boss lady! . 📸 @avigowariker ❤️ Styled by @stylebyami @rashimorbia ❤️ Hair and Make up @makeupbypompy ❤️

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. सहावीत असताना प्रियानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जब्बार पटेल यांचा ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.

प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट फॅन्सला देत असते. याशिवाय नेहमी प्रिया सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

She loved a windy day, it made her feel like she was flying.

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

नाटक, वेबसिरीज, चित्रपट आणि टीव्ही मालिका या चारही क्षेत्रात प्रियानं काम केलं आहे. प्रियाला शाळेत असल्यापासूनच अभिनय क्षेत्राविषयी कुतूहल होते. शाळेत असताना तिनं अनेक नाटकांत काम केलं होतं.

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘हॅपी जर्नी’, ‘टाइमप्लीज’, ‘टाइमपास2’, ‘वजनदार’ हे प्रियाचे गाजलेले चित्रपट आहेत. दरम्यान, अभिनेत्रीसोबतच प्रिया एक चांगली गायिकादेखील आहे.

 

View this post on Instagram

 

I am a woman, phenomenally. Phenomenal woman, That’s me. – Maya Angelou

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

प्रियाला एक थोरली बहीण असून श्वेता हे तिचे नाव आहे. श्वेता स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर असून प्रियासाठी ती ड्रेस डिझाइन करत असते.

मराठी अभिनेता ‘उमेश कामत’ आणि ‘प्रिया बापट’ हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाले असतानाही आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते

 

View this post on Instagram

 

Major throwback! #beach #myfavpic @tejasnerurkarr @saurabh_kapade @bapatshweta ❤️

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.