पुणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयास प्रतिसाद देत गणेश मंडळांची क्रिकेट स्पर्धा स्थगित केली आहे, अशी माहिती आयोजक पुनीत बालन यांनी दिली.
पुनीत बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सीरीच यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंडळांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. मुकुंद नगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दोन दिवस या स्पर्धेचे क्रिकेट सामने दिवस रात्र पार पडले. राज्य सरकारने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करण्यावर मर्यादा आणल्या आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाला पुणेकरांच्या हितासाठी प्रतिसाद देणे कर्तव्य आहे, त्यामुळे सामने स्थगित केले आहे, अशी माहिती बालन आणि आयोजन समितीने कळविली आहे.