राजगुरूनगर-टाकळकरवाडी (ता. खेड) येथे चोरट्यांनी 3 लाखांचे सोन्याचे दागिने व 62 हजार 400 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पोपट मारुती टाकळकर हे सहपरिवार गणेश मंडळाच्या आरतीसाठी वाडीत गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून घरात प्रवेश करून कपाट उचकटून दागिने व रोख रक्कम लंपास केली.
यामध्ये राणीहार, मंगळसूत्र, शॉर्ट गंठण असे दहा तोळे वजनाचे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने व 62 हजार 400 रुपये चोरून नेले. पोपट मारुती टाकळकर (वय 55) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.