पुणे- शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी व हडपसर या विधानसभा मतदारसंघाती शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या (दि. 10) मातोश्रीवर होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार, डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते अरविंद नेरुरकर, आमदार मनिषा कायंदे हे मुलाखती घेणार आहेत. शिवसेनेत ऐनवेळी इतर पक्षातील नेत्याचाही प्रवेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलाखती देणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी बाहेरचा अससो किंवा आपला निवडून येण्याच्या निकषावरच उमेदवारी दिली जाणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.