नगर – स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून दरोड घालण्याच्या इराद्याने काही इसम चिखली घाट परीसरात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्या वरून बेलवंडी पोलीस स्टेशनचे पो.नि.माने यांनी कारवाई करून चिखली घाट परीसरात पाळत ठेवून चार दरोडेखोरांना गजाआड केले आहे. तर सात जण अंधाराचा फायदा घेवून पलायन करण्यात यशस्वी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चिखली घाटपरीसरात पाळत ठेवून असलेल्या पोलीसांनी विसापूर फाट्या नजीक पांढऱ्या बोलेरो जीपमधील व दोन मोटारसायकल वरील इसम हेच दरोडा टाकण्या साठी आलेले इसम असल्याची खात्री पटल्यावरून पोलीस पथकाने घेराव घालून बोलेरो जीप मधील चार इसमांना पकडले परंतु दोन मोटार सायकल वरील व बाजूस उभे असलेले इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पोलीसांनी अटक केलेल्यात हर्षद हाबऱ्या काळे रा. देऊलगाव सिद्धी, ता. पारनेर, अकबर उर्फ जैनुद्दीन बनुलाल शेख रा. हिरवे झरे, ता.पारनेर, मंगेश भिकन बोरसे रा. साकोरा ता.नांदगाव,जि.नाशिक, नवनाथ भाउसाहेब निपटे रा. वडजी, ता.वैजापूर,जि.औरंगाबाद हे असून पंचां समक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तूर, मीर्चीपूड, लोखंडी रॉड व काठ्या मिळून आल्या.
याप्रकरणातील पळून गेलेल्या आरोपींची नावे शभू कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, शबीर कुंज्या चव्हाण, हाबऱ्या आशा काळे, शरद आशा काळे, लायसन टकासाळू भोसले, केशव किरण भोसले असल्याचे समजते. या कारवाईत पोलिसांनी बोलेरो जीप एम एच 14, डी ए 8383 व दरोड्याचे साहित्य असे 5,00,000 रुपयाची मालमत्ता जप्त केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.