जुन्नर – तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे; मात्र येत्या काळात तालुक्याला पाण्यासाठी झगडावे लागेल, असा इशारा तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिला.
कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जुन्नर येथे बोलत होते. यावेळी बांबू लागवडविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने बांबू लागवड करावी तसेच विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी निलेश बुधवंत व हरीश माकर यांनी आवाहन केले.
याप्रसंगी कात्रज दूध डेअरीचे संचालक भाऊ देवाडे, माजी नगरसेवक भाऊ कुंभार, कृषिभूषण जितेंद्र बिडवई, अजिंक्य घोलप, कृषी अधिकारी बापू रोकडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ एस. यादव तसेच प्रगतशील शेतकरी राजाराम चौधरी, शंकर ढवळे, संतोष मटाले, भागवत नांगरे, धोंडाबाई पोटे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विविध पीक स्पर्धेमध्ये मानांकन मिळविलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.