नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीमध्ये प्रोफेसर असणाऱ्या दिव्या द्विवेदी यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे त्यांनी हे वक्तव्य भारतातच पंरतु सध्या दिल्लीत सुरु असणाऱ्या जी-20 परिषदेमध्ये फ्रेंच माध्यमांना मुलाखतीमध्ये केले आहे. यामध्ये त्यांनी भविष्यातील भारतात हिंदू धर्म नसेल, असे वक्तव्य केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फ्रेंच माध्यमांना मुलाखत देताना दिव्या द्विवेदी यांनी,”एक भूतकाळातील भारत होता, ज्यामध्ये जातिव्यवस्थेच्या आधारे मोठ्या प्रमाणात लोकांवर अत्याचार आणि दडपशाही करण्यात आली. एक भविष्यातील भारत असेल, ज्यामध्ये जातिव्यवस्थेच्या आधारे होणारा भेदभाव नसेल, आणि हिंदू धर्मही नसेल.” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
“India of the future will be without Hinduism”: Divya Dwivedi, Professor at IIT Delhi.
Just a reminder that she is the same self – proclaimed intellectual who said “Hinduism is a false religion invented in earlier 20th century”. pic.twitter.com/RjurFFqbQU
— BALA (@erbmjha) September 9, 2023
पुढे त्या म्हणाल्या,”सध्या “आर्यन मानसिकता” असणारा भारत जगासमोर मांडणं सुरू आहे. त्यामुळेच इंडिया ऐवजी भारत नावावर जोर दिला जातो आहे. भविष्यातील हिंदू-विरहित भारत अद्याप जगासमोर मांडला जात नाहीये.” असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यासोबतच दिव्या यांनी, “गेल्या 300 वर्षांहून अधिक काळ जातिव्यवस्था भारताला आकार देत आहे. देशात 10 टक्के सवर्ण आहेत, मात्र तेच देशातील 90 टक्के शक्तिशाली आणि फायद्याच्या पदांवर विराजमान आहेत. हेच ‘आजही’ सुरू आहे.”असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
दिव्या द्विवेदी यांनी यापूर्वी देखील हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हिंदू धर्म हा खोटा धर्म असून, तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तयार करण्यात आला आहे”असे त्यांनी म्हटले होते.