कोल्हापूर – जम्मू-काश्मीर मध्ये सोमवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील जवान जोतिबा गणपती चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
चौगुले यांचं पार्थिव आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गडिंग्लज तालुक्यातील ऊंबरवाडी या गावात दाखल झालं. शहीद जवानाच अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो गावकरी या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. ‘शहीद जोतिबा चौगुले अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहेत. लष्करी इतमामात हे अंत्यसंस्कार होणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.