सातारा – नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन, सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून 19 कामांसाठी सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
या कामांमध्ये आयटीआय कॉलेज ते दत्तमंदिर – रस्ता डांबरीकरण (एक कोटी 34 लाख रुपये), याच मार्गावर बॉक्स कल्व्हईर करणे (एक कोटी 23 लाख), अजिंक्यतारा रोड चारभिंती लगत रस्ता व गटारासाठी (एक कोटी 64 लाख), कोयना सोसायटी बसस्टॉप ते महिंद्रा हॉटेल अखेर रस्ता डांबरीकरण (52 लाख 19 हजार), गुरुब्रह्या अपार्टमेंट, गायकवाड बंगला, व्यंकटेश अपार्टमेंट, बालविकास मंडळ ते सोन्या मारुती चौक अखेर रस्ता डांबरीकरण (23 लाख 61 हजार), जिल्हापरिषद अध्यक्ष निवासस्थान ते कल्याणी शाळा अखेर रस्ता
डांबरीकरण (66 लाख 61 हजार), डिसीसी बॅंक ते कल्याण शाळा रस्ता डांबरीकरण (61 लाख 54 हजार), पेरेंन्टस स्कूल ते रामराव पवार नगर अखेर गटार करणे (एक कोटी 39 लाख), मंगळवार पेठ, पंचवटी विहार येथे संरक्षक भिंत बांधणे(30 लाख 86 हजार), हुतात्मा स्मारक येथे शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान विकसित करणे (61 लाख 74 हजार), व्यंकटपूरा आणि चिमणपुरा अंतर्गंत ठिकाणी पाईपड्रेन करणे, रस्ता कॉंक्रिट करणे (67 लाख 80 हजार), शनिवार पेठ सिसनं.
1005 ब, सागर पावशे घर ते संतोष शेंडे घर अखेर ओढयालगत संरक्षक भिंत बांधणे (17 लाख 51 हजार), सदरबझार, जवान हौसिंग सोसायटीतील खुल्या जागेत मल्टीपर्पज हॉल बांधणे (एक कोटी 23 लाख), सदरबझार, प्रसाद गृहनिर्माण सोसायटी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (54 लाख 09 हजार), फरास चौक ते फुटका तलाव अखेर रस्ता डांबरीकरण (23 लाख 22 हजार), राजतारा हॉटेल ते अयोध्या नगरी ते दत्त मंदिर अखेर रस्ता डांबरीकरण (65 लाख 20 हजार),
रुद्राक्ष रेसिडेन्सी ते पोदार स्कूल अखेर रस्ता डांबरीकरण करणे (एक कोटी 27 लाख), शाहुनगर युनायटेड वेस्टर्न बॅंककॉलनी बोर्ड ते ग्रामसेवक भवन, आमराई अखेर रस्ता डांबरीकरण (85 लाख 50 हजार), सुमित्राराजे उद्यान येथील रस्ता डांबरीकरण (46 लाख 19 हजार) या कामांचा समावेश आहे. या कामांकरीता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी असणार आहेत.