आता मात्र हद्द झाली! मतदान संपताच पुन्हा इंधन दरवाढ?

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे पुढे ढकलली दरवाढ

नवी दिल्ली – तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बराच काळ कोणताही बदल झालेला नाही. आयएएनएसच्या अहवालानुसार, तेल कंपन्या निवडणूक संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीच्या शेवटी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची वाढ होणार आहे. तसेच ही वाढ टप्प्याटप्प्याने करता येणार आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचा शेवटचा टप्पा 29 एप्रिलला आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात किंमत वाढणार आहे. या वेळी तेल कंपन्या पेट्रोलच्या प्रति लीटर 3 रुपये आणि डिझेलवर 2 रुपये तोटा सहन करत आहेत, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किमती वाढविल्या जात नाहीत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी घटली आहे आणि त्यामुळे ते प्रति बॅरल 66 डॉलरच्या पातळीवर राहिले आहे.

27 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाही. मार्च आणि एप्रिलमध्ये त्याची किंमत चार वेळा कमी करण्यात आली. या कपातीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 77 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 74 पैशांची घट झाली.

फेब्रुवारी महिन्यात इंडियन बास्केटसाठी अव्हरेज क्रूड प्राईस 61.22 डॉलर प्रति बॅरल होती. मार्चमध्ये ते प्रति बॅरल 64.73 डॉलर होते, तर एप्रिलमध्ये आतापर्यंतची सरासरी किंमत 66 डॉलर आहे. पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत ही गेल्या 15 दिवसांतील सरासरी किरकोळ किंमत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.