नवी दिल्ली – देशातील इंधनदरवाढीचे सत्र अद्याप थांबायचे नावच घेईना. आजही पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 पेैसे तर डिझेलच्या दरात 30 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे देशात इंधन दरवाढ उच्चांकी पातळीवर गेली आहे.
दिल्लीत यावाढीमुळे पेट्रोल 102 रूपये 14 पैसे, मुंबईत 108 रूपये 19 पैसे इतके झाले आहे. दिल्लीत डिझेलचा दर 90 रूपये 47 पैसे तर मुंबईत 98 रूपये 16 पैसे इतका झाला आहे. विविध राज्यांमध्ये स्थानिक करांनुसार इंधनाचे दर वेगवेगळे आहेत.
इंधनाचे दर कच्चा तेलावर अवलंबून असले तरी अजूनही कच्चा तेलाचे दर नियंत्रित स्वरूपातच म्हणजे 78 रूपये प्रतिबॅरल इतकेच आहेत. आज झालेली इंधनातील ही दरवाढ आठवड्यातील चौथी दरवाढ आहे, तर गेल्या नऊ दिवसांतील ही सातवी दरवाढ आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांतील डिझेलचा दर शंभर रूपयांच्यावर गेला आहे.