बद्रीनाथ – बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी 6.15 वाजता वैदिक स्तोत्रे आणि पारंपारिक विधींनी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदिरी यांनी विधी केले आणि ‘वेदपाठी’ स्तोत्रांचे पठण केले.हिमालयाच्या पर्वतराजीमधील या तीर्थस्थळाच्या दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमाला भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
बद्रीनाथ मंदिर उघडल्यानंतर चार धाम यात्रा आता पूर्णपणे सुरू झाली आहे कारण यात्रेतील चारही मंदिरे आता भाविकांसाठी खुली झाली आहेत. गंगोत्री आणि यमुनोत्री 3 मे रोजी आणि केदारनाथ 6 मे रोजी उघडले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीच्या साथीमुळे त्याचा चार धाम यात्रेवर वाईट परिणाम झाला होता. ही यात्रा दोन वर्षांच्या अवधीनंतर कोविड-प्रेरित निर्बंधांशिवाय होत आहे आणि गर्दी उत्साह आहे.