पिंपरी (प्रतिनिधी) – दापोडी परिसरामधील मदरसा व मशिदींमध्ये पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी कण्यात आली. ईदनिमित्त मदरसामधील अनाथ मुलांना नवीन कपडे भेट देण्यात आले. नव्या कोर्या कपड्याचा जोडपाहून या मुलांच्या चरहर्यावर समाधान दिसत होते. याशिवाय माजी नगरसेवक संजय काटे यांनी मुस्लिम बांधवांना मिठाई व भेटवस्तू देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दापोडीमध्ये मदरसा आयशा लील बनात येथे मौलाना कारी इकबाल उस्मानी, उमेर गाजी, इरफान शेख, मौलाना झाद इकबाल, इरफान शेखअफसर हरमन शेख सलीम हैदर शेख यांनी तर सिद्धार्थनगरमधील मशिदीमध्ये अमर फारुख, मौलाना इम्तिहास अन्सारी, समीर नदाफ, डाफर शेख, इशाद शेख, जाहीर शेख तसेच दापोडी कब्रस्तान मशिदमध्ये मौलाना जाकीर शेख, साईल शेख, अमजद शेख, हुसेन तांबोळी यांच्या उपस्थितीत जामतुल मुस्लिम जामा मशिदीमध्ये नमाज पठण झाले.
पवार वस्ती येथे मौलाना हाफिज उमर, नदाफ जाफर शेख, इस्ताक शेख, फिरोज कुरेशी, जाहीर कुरेशी यांच्या उपस्थितीत नमाज पठण झाल्यानंतर विजय शिंदे व कृष्णा मोरे यांनी मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या.
फुगेवाडी कब्रस्तान येथे मौलाना साकीब यांनी विशेष नमाज पठण केली. यावेळी बहुसंख्य विविध धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती व तसेच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे,
भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन फठारे, भारत शिंदे, मुकेश मोहरे, बालाजी झोनापल्ले, दिग्विजय काटे, भैय्या देशपांडे, प्रकाश साळुंखे, निखिल काटे, कुणाल काटे, अक्षय तावरे, सनी खंडागळे, अरविंद पंडित, संतोष काटे यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.