न्यूयॉर्क – करोना विषाणूंचा संसर्ग जगभरात वाढत असल्याने विविध स्पर्धा रद्द तरी करण्यात आल्या आहेत तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करून आता ही स्पर्धा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर खेळविण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यावर जगभरातील मानांकित खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर घेण्यात येणार असल्याने अनेक टेनिसपटूंनी टीका केली आहे. मूळ वेळापत्रकानुसार फ्रेंच स्पर्धा अमेरिकन स्पर्धेच्या आधी होते हा इतिहास आहे.
यावेळी ही स्पर्धा 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा येत्या 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या काळात होत आहे. त्यानंतर फ्रेंच स्पर्धा होईल.