अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा उपक्रम

पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांडेवाडी वसाहत परिसरात मोफत आरोग्य चिकित्सा, तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील 568 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

पिंपरी परिसरातील अनेक वसाहतीमध्ये सर्वसामान्य कष्टकरी नोकरदार कुटुंबे वास्तव्य करतात, अनेकदा शारीरिक समस्या व व्याधी असूनही आर्थिक स्थितीमुळे महागडे उपचार घेणे त्यांना शक्‍य होत नाही, अशा नागरिकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या शिबिरात रक्‍तदाब, मधुमेह तपासणी, स्थूलता तपासणी, हृदयरोग तपासणी (ईसीजी), नेत्र तपासणी, त्वचेचे विकार, कान, नाक, घसा आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच ज्या नागरिकांना उपचाराची गरज आहे, अशा नागरिकांवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियाही या ठिकाणी मोफत करण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिराचे उद्‌घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजोग वाघेरे, योगेश बहल, वैशाली काळभोर, स्मीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)