सलमान खान पुन्हा एकदा बनणार मामा

सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्मा हे पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. अर्पिता आणि आयुष हे एकमेकांना 6 वर्षांपासून ओळखत असून त्यांनी चार वर्षांपूर्वी विवाह केला होता. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

अर्पिता-आयुष यांना 3 वर्षाचा मुलगा असून त्याने आहिल असे नाव आहे. सध्या तो घरातील सर्वात छोटा आणि सर्वांचा लाडका असा सदस्य आहे. आहिल हा सलमानचाही लाडका असून तो सतत आपल्या भाच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतो.

दरम्यान, अर्पिता आणि आयुष हे 18 नोव्हेंबर 2014 रोजी हैदराबाद येथे विविहबंधनात अडकले होते. या दाम्पत्याच्या लग्नाला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अर्पिताने आपल्या जीवनसाथीबद्‌दल एक भली मोठी पोस्ट लिहिली होती. तसेच आयुष यांनीही अर्पिताला बॅकबोन असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, बॉलीवूडमध्ये नवनवीन कलाकारांना संधी देणारा सलमान खान याने आयुषलाही “लवयात्री’ चित्रपटात संधी देत त्याचे चित्रपटसृष्टीत पर्दापण करून दिले आहे. जो गतवर्षी नवरात्रीला प्रदर्शित झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.