निरव मोदीचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

लंडन – पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा लंडनमधील रॉयल कोर्टस ऑफ जस्टिसने जामीन अर्ज फेटाळला आहे. बुधवारी दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते. मात्र, चौथ्यांदा नीरवचा जामीन नामंजूर केला गेला असून त्याला आता आणखी काही काळ तुरुंगात रहावे लागणार आहे.

त्यातच नीरव मोदी साठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. 12 तयार ठेवण्यात आला आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याचे वृत्त चर्चेत आहे. नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये 19 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.