पिंपरी- सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातून सोमवारी (दि. 4) चौघे करोनामुक्त झाले. त्यामध्ये चार वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. तर, रुग्णालयात नव्याने चौघा करोना रुग्णांची भर पडली.
करोनामुक्त झालेले रुग्ण हे टेंभुर्णी (सोलापूर), औंध येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये 4 वर्षीय मुलीसह 2 महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात नव्याने चौघांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये 5 वर्षीय मुलीसह 2 महिला व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
नारायणगाव, औंध, जुनी सांगवी या परिसरातील हे रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील एका करोना संशयित रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात सध्या 22 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 682 जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 160 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.