राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राक्षेवाडीत करोना बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी चार जण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील करोना रुग्णाची संख्या ५ झाली आहे. करोना बाधित व्यक्तीची पत्नी, सासू, मेव्हणा व भाचा असे चार जण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
राजगुरुनगर शहराच्या लगत असलेल्या राक्षेवाडीतील एका इमारतीमधील बाधित व्यक्ती राहत होती. त्याच्या शेजारील चाळीत त्याची बहीण तिच्या कुटुंबासह राहत होती. बाधित व्यक्ती पुण्यातील एक खाजगी रुग्णालयात कामाला जात होता. बहीण भावाच्या घरात एकमेकांचा वावर होता. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती शुक्रवारी (दि.१५) रोजी करोना बाधित आढळून आली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या ११ व्यक्ती प्रशाससानाने हायरिक्स म्हणून घोषित केल्या होत्या. त्यांची स्वब टेस्ट साठी त्यांना पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी काल (दि.१६) रोजी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स आणि केस कापणारा न्हावी या तिघांचे स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
आज (दि.१७) रोजी करोना बाधित व्यक्तीची पत्नी, सासू, मेव्हणा आणि भाचा यांना करोनाची लागण झाली असून त्यांचा स्वब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे स्वब रिपोर्ट अजून प्राप्त नाहीत. तालुक्यात करोना बाधित रुग्णाची संख्या ५ झाली आहे. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी ६ जणांना तपासनीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याचे डॉ गाढवे यांनी सांगितले. राक्षेवाडीत पाच जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी सोशल डिस्टन्स पाळावा, घरीच थांबावे व शासनाचे नियम अटींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.