कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोना संकट अधिक गडद
कोल्हापूर – जिल्ह्यात आज एकाचवेळी 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सकाळी चार तर सायंकाळी चार जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 43 वर गेली आहे.
हे सापडलेले रुग्ण कोल्हापूर, शाहूवाडी तालुका, आजरा तालुका ,पन्हाळा तालुका, भुदरगड तालुक्यातील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाच्या मध्ये 3 पुरुष, एक महिला आणि 8 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
जिल्ह्यात मुंबई, पुणे , रायगड, सोलापूर हुन कोल्हापूरात येणारे बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या मुळे कोल्हापूरात कोरोना वाढत असल्याने कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.