Mike Procter dies aged 77 :- दक्षिण आफ्रिकेचे महान क्रिकेटपटू माइक प्रॉक्टर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. माइक प्रॉक्टर यांनी डरबन येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी मरिना यांनी दक्षिण आफ्रिकन प्रेसला ही बातमी दिली.
माइक यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
माइक त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. माइक यांनी २००२ ते २००८ या कालावधीत आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले होते. यापूर्वी ते दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते.
Former South African all-rounder, coach and ICC match referee Mike Procter has died at the age of 77.https://t.co/3502NgCgmZ
— ICC (@ICC) February 18, 2024
त्यांनी १९७० ते १९८० सालच्या दशकात दक्षिण आफ्रिका संघ क्रीडा क्षेत्रापासून लांब होता, त्यामुळे प्रॉक्टरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमी झाली. तो दक्षिण आफ्रिकेकडून केवळ ७ सामने खेळले. हे सर्व १९६६-६७ ते १९६९ या काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले गेले. या कालावधीत त्यांनी ४१ बळी घेतले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला आपण खेळलेल्या सातपैकी सहा कसोटी सामने जिंकून दिले, तर एक सामना अनिर्णित राहिला.
माइक त्याच्या चेस्ट-ऑन अक्शनसाठी आणि त्याच्या डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये लवकर चेंडू रीलीज करण्याच्या शैलीने प्रसिद्ध होते. वर्णभेदानंतरच्या काळात दक्षिण आफ्रिका संघाचे पहिले प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. प्रशिक्षक म्हणून माइक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १९९२ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते. माइक यांनी देशांतर्गत कारकीर्दीत ४०१ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात ४८ शतके आणि १०९ अर्धशतकांसह २१,९३६ धावा केल्या. या काळात त्यांनी १,४१७ बळीही घेतले.