Hybrid Mutual Funds : हायब्रिड म्युच्युअल फंड योजना ( Hybrid Mutual Funds ) गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत. या योजनांनी जानेवारी 2024 मध्ये 20634 कोटी रुपये उभारले. ही रक्कम मागील महिन्याच्या तुलनेत 37 टक्के अधिक आहे. डेब्ट किंवा बाँड फंडांसाठी ( debt or bond funds ) कर आकारणी कायद्यातील बदलांनंतर पर्यायी गुंतवणूक पर्याय म्हणून हायब्रीड म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एप्रिल-जानेवारी दरम्यान या योजनांमध्ये एकूण 1.21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
हायब्रीड म्युच्युअल फंड योजना काय आहे?
हायब्रीड म्युच्युअल फंड योजना साधारणपणे इक्विटी आणि डेब्ट सिक्युरिटीजमध्ये ( equity and debt securities ) गुंतवणूक करतात. तर कधीकधी सोन्यासारख्या इतर मालमत्ता श्रेणींमध्येही गुंतवणूक करतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) च्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये हायब्रीड योजनांमध्ये 20634 कोटी रुपये गुंतवले गेले. ही आकडेवारी डिसेंबर 2023 मध्ये 15009 कोटी रुपये होती.
या महिन्यात हायब्रीड फंडांच्या दोन श्रेणी आर्बिट्रेज फंड आणि मल्टी-एसेट अलोकेशन फंड ( arbitrage funds and multi-asset allocation funds ) यांनी सर्वाधिक गुंतवणूक केली. जानेवारीमध्ये हायब्रीड फंडांमध्ये 20,637 कोटी रुपयांच्या इनफ्लोंपैकी आर्बिट्राज फंडांमध्ये 10,608 कोटी रुपयांची गुंतवणूक दिसून आली. तर मल्टी-एसेट अलोकेशन फंडमध्ये 7,080 कोटी रुपये गुंतवणूक झाली. शिवाय, गेल्या सहा महिन्यांत हायब्रीड श्रेणीतील सुमारे 50 ते 70 टक्के वाटप आर्बिट्राज फंडमध्ये जात आहे.
तज्ञांचे मत काय आहे ?
आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीझ ( Firoz Aziz, Deputy CEO, Anand Rathi Wealth Limited ) म्हणाले की, या श्रेणीतील ओघ ( inflows ) वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कर कायद्यातील बदलानंतर त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. याव्यतिरिक्त, सुलभ वैविध्य देणारी बहु-मालमत्ता श्रेणी ( multi-asset categories ) गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
मध्यम किंवा कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड फंड अधिक आकर्षक असतात. हे फंड गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत कारण ते इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्याशी संबंधित अस्थिरता कमी करतात तसेच स्थिर-उत्पन्न बाजारात ( fixed-income market ) स्थिरता प्रदान करतात. बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की डेट फंडांसाठी ( debt funds ) कर आकारणीत बदल केल्यानंतर, गुंतवणूकदार त्यांच्या निश्चित उत्पन्नाचा काही भाग हायब्रीड फंडांद्वारे ( hybrid funds ) गुंतवण्याचा विचार करत आहेत.