नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होताना दिसत आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकार आणि मोठ्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे नेते एचडी देवगौडा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
देवगौडा यांच्या पत्नी चेन्नमा यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. देवगौडा यांनी बुधवारी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. एच डी देवगौडा यांनी बुधवारी ट्विट केले, की माझी पत्नी चेन्नमा आणि माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
My wife Chennamma and I have tested positive for COVID-19. We are self-isolating along with other family members.
I request all those who came in contact with us over the last few days to get themselves tested. I request party workers and well-wishers not to panic.— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच आम्हीदेखील आयसोलेशनमध्ये आहोत. मागील काही दिवसात आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या शुभचिंतकांना विनंती करतो, की घाबरुन जावू नका. देवगौडा यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना काहीही काळजी न करण्याचं आवाहन केलंय. देवगौडा यांच्या कोरोनाच्या अहवालाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. तसेच, देवगौडा व त्यांच्या पत्नीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. 87 वर्षीय देवगौडा 1 जून 1996 पासून 21 एप्रिल 1997 या काळात देशाचे पंतप्रधान होते. याशिवाय ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीदेखील होते.