माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा 8 ऑगस्टला ‘भारतरत्न’ किताबाने होणार सन्मान

भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांचाही होणार गौरव

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या 8 ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे. या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. या तिघांच्या नावाची घोषणा जानेवारीमध्येच करण्यात आली होती. त्यामुळे आता येत्या ऑगस्टमध्ये हा कितबा देण्यात येणार आहे.

भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह 12 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)