चंद्रपूर – माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांचे आज (ता.13) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. साळवे यांनी आज चंद्रपुरातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
एकनाथराव साळवे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अनेक नक्षल संबंधित खटल्यात नक्षलवाद्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. 1967 ते 1978 असे दोन टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काॅंग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी सरकार आणि नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सोडवणूक करण्यात त्यांचा मुख्य वाटा असल्याचे सांगितले जाते.