वाघोली येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार

वाघोली :   हवेली तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील,  वाघोली भाजप शहराध्यक्ष केतन जाधव यांच्या वतीने  माजी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा विक्रांत पाटील यांचा सत्कार  करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, पुणे जिल्हा भाजप सचिव सचिन जाधव, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता  पक्ष  राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी भुजबळ, भाजप युवा मोर्चा राज्य सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजप युवा मोर्चा प्रदेश  उपाध्यक्ष अनुप मोरे,

पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अमोल शिवले,  पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव,प्रदीप सातव,गणेश सातव, शरद आव्हाळे, योगीराज शिंदे, ओंकार कंद, गौरव झुरुंगे, अभिषेक उंद्रे, स्वप्नील उंद्रे,उमेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता हरगुडे,प्रदीप सातव,विजय जाचक आदी मान्यवर उपस्थित होते.

वाघोली येथे युवा संवाद, व युवा वारियर शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याची माहिती अनिल सातव, केतन जाधव यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.