वाचकांच्या सोयीसाठी लवकरच डिजिटल ग्रंथालय : नगरसेवक नाना भानगिरे

हडपसर – राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हांडेवाडी रोड येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्र याठिकाणी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

लहान विद्यार्थी ते जेष्ठ नागरिकांना पर्यंत तसेच महिलांसाठी मातोश्री मीनाताई ठाकरे वाचनालय (ग्रंथालय)चालू सुरू करण्यात आले आहे. या वाचनालय मध्ये विविध प्रकारची पुस्तके आहेत.प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ठरणारी अनेक पुस्तके येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तसेच लहान मुलांसाठी गोष्टी आणि जेष्ट नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके उपलब्ध आहेत. या वेळी उल्हास शेवाळे ,अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे,सचिन भानगिरे ,योगेंद्र गायकवाड, योगेश सातव,विकास शेवाळे, म्हेत्रे काका,राजन नाईक, नितीन बोके,विश्वास पोळ, नाना बारगुळे , तारा सिंग, प्रचंड प्रमाणात जेष्ठ नागरिक, संतोष जाधव, प्रवीण हिलगे,रोहित बालचिम, सुनिल पाटील, बाबर ताई, बेळगे ताई महिला व शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त इतर अनाठायी खर्च टाळून ग्रंथालय सुरू करून सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात नागरिकांना व स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना सोयीचे ठरेल असे, डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.