काबूल – अफगाणिस्तानातील माजी खासदार महिलेची आणि त्यांच्या अंगरक्षकाची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. काबूलमध्ये रविवारी राहत्या घरीच हल्लेखोरांनी या दोघांची हत्या केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुसरल नबिझदा असे या माजी खासदार महिलेचे नाव आहे.
तालिबानने ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतरही काबूलमध्येच राहिलेल्या काही निवडक माजी खासदारांपैकी त्या एक होत्या. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून प्रथमच पूर्वीच्या प्रशासनातील लोकप्रतिनिधीची हत्या करण्यात आली आहे.
हल्लेखोरांनी शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एकाच खोलीत असलेल्या नबिझदा (Mursal Nabizada) आणि त्यांच्या अंगरक्षकाची हत्या केली गेली, असे पोलीस प्रमुख मौलवी हमिदुल्लाह खलिद यांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये नबिझदा यांचे बंधू आणि आणखीन एक अंगरक्षक जखमी झाले आहेत. तर तिसरा अंगरक्षक पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला, असेही पोलिसांनी सांगितले.
#RussiaUkraineWar : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील मृतांच्या संख्येत वाढ
नबिझदा यांचे कार्यालय त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर होते. तेथेच त्या मरण पावल्या. या हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र हत्येमागील हेतू काय असावा, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही.
Optical Illusion : फक्त 3 टक्के लोकांनी शोधला ‘या’ फोटोत लपलेला बेडूक, पाहा तुम्हाला दिसतोय का?
नबिझदा या 2019 मध्ये काबूलच्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या. संसदेच्या संरक्षण आयोगाच्या सदस्या होत्या. “इन्स्टिट्युट फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च’ नावाचा खासगी बिगर सरकारी गटही त्या चालवत होत्या.