नवी दिल्ली – आजपासून देशातली सर्वात मोठी वाहन निर्मिता कंपनी मारुती सुझुकीची कार विकत घेणे महाग होत आहे. कंपनीच्या घोषणेनुसार 16 जानेवारी 2023 पासून मारुती सुझुकी मॉडेल्सच्या किंमती सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कंपनीने मॉडेलच्या वाढत्या किंमतीला महागाई आणि अलीकडील नियामक आवश्यकता यांना जबाबदार धरले आहे. त्याचवेळी, ही वाढ सर्व मॉडेल्समध्ये भिन्न-भिन्न असेल, असे सांगण्यात येत आहे.
मारुतीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले होते. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महागाई आणि नवीन नियम लागू केल्यामुळे मॉडेल्सची किंमत वाढत आहे, यामुळे किंमत कमी करण्यासाठी आणि किंमतीतील वाढ अंशतः ऑफसेट करण्यासाठी मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली जाईल. दरम्यान, 2022 मध्ये मारुतीने आपल्या वाहनांच्या किंमती तीन वेळा वाढवल्या होत्या. त्यावेळी कमाल वाढ 4.3 टक्क्यांपर्यंत होती, जी 6000 रुपयांपर्यंत होती. तर जानेवारी, एप्रिल आणि जुलै या महिन्यांमध्ये किंमतीत वाढ केली होती.
ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित झाल्या मारुतीच्या तीन जबरदस्त कार –
दिल्लीत सुरूअसलेल्या ऑटो एक्स्पो 2023मध्ये मारुतीने तिचे दोन आलिशान मॉडेल जिमनी, ईव्हीएक्स एसयूव्ही आणि फ्रॉन्क्स सादर केले आहेत. मारुती जिमनी 5-दरवाजा असलेले मॉडेल म्हणून सादर करण्यात आली आहे. जी एक ऑफ-रोड एसयूव्ही आहे. कंपनीने याचे बुकिंगही सुरू केले असून ते मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह आणले जात आहे. तर, फ्रॉन्क्स ही एक काॅन्सेप्ट कार म्हणून आली आहे, जी तीन ड्युअल-टोन कलर पर्यायांमध्ये लॉन्च केली गेली आहे. ईव्हीएक्स एसयुव्ही ही कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे जी 4*4 पॉवरट्रेनसह आली आहे.