मुंबई – रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर. कृष्णकुमार यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णकुमार हे रतन टाटा यांच्या विश्वासू सहाय्यकांपैकी एक मानले जात होते. कृष्णकुमार हे टाटाच्या कन्सल्टन्सी फर्म, आरएनटी असोसिएट्स आणि समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतलेले होते. ज्यामध्ये टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये 66 टक्के हिस्सा आहे.
आता राहुल माफी मागणार का? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचा सवाल!
माजी संचालक आर. कृष्णकुमार यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे. माझे मित्र आणि सहकारी आर. कृष्णकुमार यांच्या निधनाने मला जाणवलेल्या भावनेचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. आम्ही ग्रुपमध्ये आणि वैयक्तिकरित्या एकत्रित केलेला व्यवहार मला नेहमी लक्षात राहील.
ते टाटा समूह आणि टाटा ट्रस्टचे खरे दिग्गज होते आणि सर्वांनाच त्यांची आठवण येईल, अशा शब्दांत रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच टाटा सन्सचे विद्यमान चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनीही कृष्णकुमार यांच्या टाटा समूहातील योगदानाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, कृष्णकुमार यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.